fbpx

पालघर निवडणुक बाकीचे चीटिंग करुन जिंकले, नैतिक विजय आपलाच झाला- आदित्य ठाकरे

aaditya

मुंबईः पालघर निवडणुकीच्या वेळी अख्ख्या देशाचं लक्ष शिवसेनेकडे होतं, बाकीचे चीटिंग करुन जिंकले, नैतिक विजय आपलाच झाला, असे आज युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडले.

स्वबळावर लढायचे आहे ते स्वबळावरच एकहाती सत्ता आणायची ती महाराष्ट्रातच, अशी गर्जना आज युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिली. तन आणि मन लावून शिवसैनिक लढत असतात. आपल्याला फक्त मतं नाही तर मनंही जिंकायची आहेत. महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायचीच ही शपथ मी या मंचावरून घेतो आहे. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्र्यांकडून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!

शिवसेनेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसणार ‘संजू’ चित्रपटात ?