fbpx

पालघर नगरपरिषद निवडणुक निकाल; सेनेचा गड आला पण सिंह गेला..

shivsena flag

टीम महाराष्ट्र देशा- अंत्यंत चुरशीच्या पालघर नगरपरिषदेच्या 28 जागांचे निकाल हाती आले आहेत. शिवसेनेचे तब्बल 14 नगरसेवक विजयी झाले आहेत. मात्र,नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ.उज्ज्वला केदार काळे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे सेनेची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.

पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे आज निकाल लागले. नगरपरिषदेच्या या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा प्रत्येकी एक-एक उमेदवार हा बिनविरोध निवडून आला होता. त्यामुळे 26 जागांवर निवडणूक लढवण्यात आली. त्यानंतर आज लागलेल्या निकालात एकूण 28 जागांपैकी 20 जागांवर शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळवला.

दरम्यान,नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून आणण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रवादीला फायदा झाला आहे. काळे यांनी शिवसेनेच्या उमेदवार श्वेता पटाील यांचा पराभव केला.