पालघरमध्ये पाठिंबा द्या आणि पलूसमध्ये पाठिंबा घ्या, भाजपची कॉंग्रेसला खुली ऑफर

bjp vr congress

टीम महाराष्ट्र देशा- चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं अडचणीत सापडलेल्या भाजपानं आता थेट काँग्रेसकडे पाठिंबा मागितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पालघरमध्ये पाठिंबा द्या आणि पलूसमध्ये पाठिंबा घ्या, अशी ऑफर भाजपाकडून काँग्रेसला देण्यात आलीय. याआधी भाजपानं पालघरमधील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेलाही गळ घातली होती. वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवा, आम्ही त्यांचं पुनर्वसन करू, असा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेला दिला होता.

भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत आहे,चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवासन वनगा यांनी ही निवडणूक शिवसेनेकडून लढण्याचा निर्णय घेतल्याने पालघर पोटनिवडणुक चर्चेचा विषय ठरलीये. शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी दोन दिवसांपूर्वीच आपला अर्ज दाखल केलाय तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राजेंद्र गावित आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.

दरम्यान आज शेवटच्या दिवशी वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवा, त्याचं आम्ही पुनर्वसन करु, असा नवा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला आहे.श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी किंवा विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, असं भाजपने म्हटलं आहे. मात्र शिवसेनेने या प्रस्तावावर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या मृत्यूमुळे पलूसमध्ये पोटनिवडणूक होतेय. याठिकाणी काँग्रेसनं पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली आहे . पलूसमधील निवडणूक बिनविरोध व्हावी, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपाचा प्रस्ताव काँग्रेस स्वीकारणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेनं स्वबळाची भाषा केल्यानंतर भाजपने युतीचा प्रस्ताव दिला होता, त्यानंतर आता पालघर पोटनिवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला गळ घालत आहे.पालघर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.

Loading...

 

3 Comments

Click here to post a comment