पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १४ जणांचे अर्ज

पालघर – भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होणार असून, या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काल शेवटचा दिवस होता . शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १४ जणांचे उमेदवारी अर्ज आले आहेत.

Loading...

या पोटनिवडणुकीसाठी संदीप रमेश जाधव (अपक्ष, समता सेना), बळीराम सुकर जाधव (बहुजन विकास आघाडी), वसंत नवशा भसरा (बहुजन विकास आघाडी), दामोदर बारकू शिंगडा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), पास्कल जान्या धनारे (भारतीय जनता पार्टी), राजेंद्र धेंड्या गावित (भारतीय जनता पार्टी), शंकर भागा बदादे (मार्क्सस्टि, लेनीस्ट पार्टी आॅफ इंडिया-रेड फ्लॅग), राजेश रघुनाथ पाटील (बहुजन विकास आघाडी),मधुकर पांडुरंग चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), अशोक गोविंद शिंगडा (भारिप बहुजन महासंघ), प्रभाकर धोंडू उराडे (अपक्ष) शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किरण राजा गहला, वनशा सुरजी दुमाडा या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी जरी १४ अर्ज प्राप्त झाले असले तरी खरी लढत ही, भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्यामध्येच होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही ही उमेदवार पक्षातर्फे आयत्यावेळेस आयात करण्यात आलेले आहेत. या पोटनिवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.Loading…


Loading…

Loading...