fbpx

पालघर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अखेर गावितांना उमेदवारी

मुंबई – भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अखेर राजेंद्र गावित यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, ते बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या लोकसभेच्या जागेसाठी त्यांच्या मुलाने श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने, भाजप राजेंद्र गावित यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. मात्र सुरवातीला गावित यांनी हे वृत्त फेटाळून लावत, आपण काँग्रेससोबतच असल्याचं सांगितले होते.

दरम्यान भाजपमध्ये जाणार नसल्याचं सांगणाऱ्या गावितांनी मात्र काल सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. गावित यांच्या भाजप प्रवेशानंतर राजेंद्र गावित यांना भाजपाने पालघरमधून लोकसभेची उमेदवारी दिली असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.