भाजपच्या अंतर्गत मामल्यात शिवसेनेला नाक खुपसण्याची गरज नाही – योगी आदित्यनाथ

YOGI_Adityanath

मुंबई – भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत असून, या पोटनिवडणुकीच्या जबाबदारीची धुरा भाजपने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सोपवली आहे.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी पालघरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. वनगा कुटुंबीय आणि त्यांच्या पुत्राला उमेदवारी देणे हा भाजपाचा अंतर्गत मामला होता. त्यात नाक खुपसण्याचे शिवसेनेला काहीही कारण नव्हते. तरीही त्यांनी ती आगळीक केल्याचं आदित्यनाथ यांनी म्हंटलं आहे. तसेच शिवसेना नाव जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे घेत असली तरी तिची करणी मात्र अफजलखानाची आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

शिवसेनाप्रमुखांना कुणीही विसरू शकणार नाही. कारण त्यांनी कधीही कोणाच्याही पाठित खंजीर खुपसला नाही. परंतु आता ते कार्य शिवसेनेकडून सुरू आहे. चिंतामण वनगा हे माझे जवळचे मित्र होते. त्यांनी पालघरच्या विकासासाठी मोठे काम केले. त्यामुळे त्या मैत्रीपोटी मी येथे आलो. असल्याचं त्यांनी म्हंटलं.