शिवसेनेंकडून श्रीनिवास वनगा आज भरणार उमेदवारी अर्ज! भाजप अजूनही संभ्रमात

palghar-rally-

पालघर : शिवसेनेंकडून श्रीनिवास वनगा आज भरणार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिवसेनेने भाजपसोबत चांगलीच राजकीय चाल खेळली. तर भाजपचा अजून उमेदवारही निश्चित होताना दिसत नाही. भाजप उमेदार देण्याबाबत अजूनही तळ्यात कि मळ्यात आहे. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

दिवंगत चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबियांकडे भाजपने दुलर्क्ष केल्याची खंत व्यक्त करत. वनगा कुटुंबियांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.  दरम्यान, दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वानगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना अज्ञातस्थळी ठेवलं आहे. श्रीनिवास वानगा आज शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

आता भाजपला जाग आली आणि धावपळ सुरु झाली. शिवसेनेच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे भाजप अजूनही संभ्रमात आहे.  पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा, आमदार पासकल धानोरा, मनीषा चौधरी आणि स्थानिक पदाधिकारी हे काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काय राजकारण शिजले हे पुढील दिवसात स्पष्ट होईल.