fbpx

पालघर निवडणूक: मतदारांना आमिष दाखवणारी भाजप नेत्याची आणखीन एक ऑडियो क्लिप व्हायरल

bjp flag

पालघर: पालघर लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे, शिवसेना आणि भाजपने निवडणूक प्रतिष्टेची केली आहे. प्रचारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साम दाम दंडवाली ऑडियो क्लिप पुढे आणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली होती, दरम्यान, आज एका बाजूला मतदान सुरु असताना दुसरीकडे भाजप नेत्यांची आणखीन एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये नागरिकांना आमिष दाखवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हि कथित ऑडियो क्लिप भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांची असल्याच कळतयं, यामध्ये भाजपाचे पदाधिकारी अनेक सोसायटींमध्ये फोन करून नागरिकांना आमिष दाखवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाला मतदारांना प्रलोभन देण्याची आवश्यकता नसल्याच सांगत राजन नाईक यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

भाजपने पालघरमधील ईव्हीएममध्ये सेटिंग केली; मतदान सुरु असतानाच हितेंद्र ठाकुरांचा गंभीर आरोप

दरम्यान, मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक मशीनमध्ये बिघाड झाल्याच समोर आल आहे. त्यामुळे काही ठिकाणाचे मतदान थांबवण्यात आल आहे. यामध्येच भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये सेटिंग केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. भाजप साम, दाम, दंड याचाही वापर करत आहे आणि रडीचा डाव खेळत असून लोकशाहीचा हा घात आहे असेही ठाकूर म्हणाले.