पालघर पोटनिवडणूक : पैशे वाटप प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल

वाणगाव : पालघरच्या पोटनिवडणुकीत भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप होतोय. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रानशेत भागात भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडल्याने पालघर मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार अमित घोडा, युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई अन्य कार्यकर्ते रानशेत भागात प्रचार करत होते. दरम्यान, दोन व्यक्ती हातात पिशव्या घेऊन संशयास्पदपणे फिरत असतांना शिवसेना कार्यकर्त्यांना दिसले. पिशव्यांची झडती घेतली असता आतमध्ये पैशांची पाकिटे दिसून आली.

तुम्हाला कुणी पाठवले, असा सवाल करताच त्या दोघा इसमांनी आम्हाला भाजपचे पदाधिकारी अशोक अंबुरे यांनी पाठवले असल्याची स्पष्ट कबुली दिली. तसेच ‘पैसे लो… कमल के फूल पर बटन दबाव…’ असे आम्ही मतदारांना सांगत असल्याचे या व्यक्तींनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान आरोपींना अटक करण्याच्या मागणीकरता शिवसेनेचे नेते पोलीस स्थानकात ठाण मांडून बसले होते. शेवटी या प्रकरणी पोलिसांनी 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कलम 171 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली.

You might also like
Comments
Loading...