fbpx

पालघर पोटनिवडणूक : भाजप १४ हजार मतांनी आघाडीवर

bjp-flag-representational-image

टीम महाराष्ट्र देशा : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पालघरमध्ये २८ मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.

पालघर पोटनिवडणूक निकालामध्ये अत्यंत चुरस पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासून भाजपने आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरीनंतर भाजप उमेदवार राजेंद्र गावित 14236 मतांनी आघाडीवर आहेत.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.