नवाज शरीफांना पंतप्रधान पदावरून ह्टवल  

पनामा प्रकरणात पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने ठरवल दोषी  

वेबटीम : पनामा प्रकरणात पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवल आहे. यामुळे आता शरीफ यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आल  आहे. पनामा घोटाळा प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या  सुप्रीम कोर्टच्या पाच सदस्यीय खंड पीठाने हा निर्णय दिला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गैरमार्गाने विदेशात संपत्ती निर्माण केल्याच्या प्रकरणाची चौकची करण्यासाठी एक स्पेशल समिती बनवण्यात आली  होती . या चौकशी समितीने १०  जुलैला आपला अहवाल कोर्टासमोर सादर केला होता. या अहवालात शरीफ यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यास सुचवण्यात आल होत. यानंतर आता कोर्टाने शरीफ यांना दोषी ठरवल आहे.