fbpx

#JusticeForAsifa: असिफाच्या बलात्कारामागे पाकचा हात,मध्य प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप

justice

टीम महाराष्ट्र देशा- कठुआमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीवर मंदिर परिसरातच सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यातच आली. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याची भीषणता समाजासमोर आली आणि अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. मात्र भाजप नेते नंदकुमार सिंह चौहान यांनी या घटनेमागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला आहे. नंदकुमार सिंह चौहान हे मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत.

नेमकं काय म्हणाले नंदकुमार सिंह चौहान?
हिंदुस्थानी मुलीवरील बलात्कारानंतर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या जातात म्हणजे नक्कीच पाकिस्तानी एजंटकडून देशात भेद निर्माण करण्यासाठी ते हे करत आहेत.काश्मिरात हिंदूंची संख्या एक टक्केही नाही. जे काही हिंदू आहेत, ते आधीपासूनच असहाय आहेत आणि आपलं तोंडही उघडू शकत नाहीत, ते ‘जय श्री राम’च्या घोषणा कशा देऊ शकतात? त्यामुळे काश्मिरात जे काही सुरु आहे, ते पाकिस्तानी एजंट करत आहेत.

काय आहे प्रकरण ?
10 जानेवारीला असिफा खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीनं अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानूष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर असिफाची हत्या केली.शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला असिफाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली.17 जानेवारीला जंगलात असिफाचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला.

या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली.संजी रामला मदत करणं आणि असिफावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्यानं देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध करताना आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

1 Comment

Click here to post a comment