पाकिस्तान सरकारचा हाफिज सईदला दणका 

सईदची संपत्ती जप्त करण्याच्या तयारीत 

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तान सरकार दहशतवादी हाफिज सईदची संपत्ती जप्त करण्याचा तयारीत आहे. हाफिज सईद मुंबईवरील दहशतवादी हल्याचा मास्टर माइंड असून  पाकमध्ये हाफिजकडून चालवण्यात येणारी चॅरिटी आणि इतर त्याच्या संपत्ती जप्त होण्याची श्यक्यता आहे.

पाकिस्तान सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची १९ डिसेंबर रोजी एक गोपनिय बैठक पार पडली. या बैठकीत हाफिज सईदची संपत्ती जप्त करण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह ए इन्सानियत फाऊंडेशनशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे. २६/११ सईदने मुंबईवर हल्ला केला होता. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका या दोघांनीही हाफिज सईदला दहशतवादी घोषित केले आहे.

You might also like
Comments
Loading...