मेरे लिए दुआ करें…’ पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी कोरोना पॉझिटिव्ह

Minister Shah Mahmood Qureshi

कराची – जगभरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. अनेक राजकीय मंडळी याच्या विळख्यात अडकले आहेत. यातच आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: शुक्रवारी टि्वट करुन करोना व्हायरसची बाधा झाल्याची माहिती दिली.

कुरेशी नियमानुसार क्वारंटाइन झाले आहेत. कोरोनाची लागण झालेले ते पाकिस्तानातील वरिष्ठ राजकारणी आहेत.पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांना हळू हळू ताप येऊ लागला. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं. ‘माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं मी घरातून आपलं काम करत आहे. पण मी बरं व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करा.’ असं कुरेशी यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,21,896 वर पोहोचला आहे. 1,13,623 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर 1,08,273 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पाकिस्तानची कोरोनामुळे पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असून आरोग्य यंत्रणेवर खर्च करण्यासाठी देखील पैशांची जमवाजमव सुरु आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला झाला कोरोना

धक्कादायक : शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

सरकारी बंगला सोडल्यावर प्रियंका गांधी-वाड्रा ‘या’ शहरात राहण्याची शक्यता