राखीच्या छातीवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज; सोशल मीडियावर संतापाची लाट

टीम महाराष्ट्र देशा – वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीचा पाकिस्तानी राष्ट्रध्वजासोबतचा फोटो व्हायरल झाला असून सोशल मिडीयावर तिला जोरदार ट्रोल केलं जाऊ लागलं आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोत राखी नदीच्या किनाऱ्यावर उभी आहे. तिने आपल्या छातीवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज घेतलेला दिसत आहे. राखीचा हा फोटो पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, हा फोटो राखीच्या आगामी चित्रपटातील सेटवर काढलेला असल्याची माहिती समोर आली आहे.राखीने हा फोटो शेअर करताना याबद्दल माहिती देताना म्हटलं आहे की, मला माझा भारत खूप आवडतो. मात्र हा फोटो माझा आगामी चित्रपट ‘धारा 370’मधील आहे. हा एक पाकिस्तानी सेट असल्याचं तिने सांगितलं आहे.