पाकिस्तानचा खोटेपणा बाहेर आला, भारताने पडलेल्या विमानाचे अवशेष सापडले

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तान कडून बुधवारी सकाळी वायुसेनेच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्यात आली. त्यावेळी पाकिस्ताने F16 या विमानाचा वापर करण्यात केला होता. पाकिस्तानने केलेल्या या घुसखोरीला भारताच्या सतर्क असलेल्या लष्कराने परतवून लावले, तर या कारवाई वेळी पाकिस्तानचे एक विमान पाडण्यात देखील भारताला यश आले. पण पाकिस्तान मात्र हे मान्य करण्यास तयार नव्हते पण आता भारताने पडलेल्या या विमानाचे अवशेष पाक व्याप्त काश्मीरमध्ये सापडले असून पाकिस्तानचा अजून एक खोटेपणा बाहेर आला आहे.

भारताकडून पाकिस्तानचे एक विमान पाडल्याचा दावा केला होता पण पाकिस्तान मात्र ते मान्य करायला तयार नव्हते. इतकंच नाही तर F16 विमानाचा वापरच झाला नव्हता, असा दावाही पाकिस्तान सैन्याच्या प्रवक्त्यांनी केला होता. पण पाकिस्तान ज्या अवशेषांना भारताचं विमान असल्याचा दावा करत आहे, ते GE F110 इंजिन आहे, जे F16 विमानात लावलं जातं.एनएनआय या वृत्तसंस्थेनकडून F16 विमानाच्या इंजिनाचा एका फाईल फोटोही शेअर केला आहे, जे ढिगाऱ्यात दिसत असलेल्या फोटोशी मिळतंजुळतं आहे.

दरम्यान पाकिस्तानकडून देखील भारताचे मिग 21 हे विमान पाडण्यात आल असून भारताचा एक वैमानिक देखील पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याच नाव अभिनंदन वर्धमान असे असून तो विंग कमांडर आहे. पाकिस्तान कडे तो आता सुखरूप आहे. लवकरच जिनिव्हा या कायद्यानुसार अभिनंदन वर्धमान याला भारताच्या ताब्यात देणार आहेत असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितल आहे.