पाकिस्तानच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

श्रीनगर – पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) ने नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करीत भारतीय जवानांवर हल्ला केला. यामध्ये भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. हे दोघेही जवान महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. औरंगाबादचे नाईक संदीप सर्जेराव जाधव (३५) आणि कोल्हापूरचे शिपाई श्रावण बाळकू माने (२५) अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.