fbpx

…तर पाकिस्तानी नागरिकाला मिळणार भारतीय पासपोर्ट !

टीम महाराष्ट्र देशा : ५० वर्षांपेक्षा जास्त काळ भारतामध्ये राहणाऱ्या पाकिस्तानात जन्म घेणाऱ्या नागरिकाला आता भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबई उच्च न्यायालयाला हि माहिती दिली आहे.

कराडीया कुटुंब हे मुळचे गुजराती. पाकिस्तान फाळणी नंतर पाकिस्तान मधील कराची येथे कराडीया यांचा जन्म झाला. परंतु त्यांच्या आईने काही दिवसांमध्येच त्यांना मुंबईमध्ये आणले. तेव्हापासून ते भारतातच राहिले. त्यामुळे पाकिस्तानशी त्यांचा कोणताही संबंध नाही.

२०१६ मध्ये त्यांचा दीर्घकालीन व्हिजा रद्द झाला त्यानंतर त्यांनी नुतनीकरणा साठी अर्ज केला. परंतु त्यांना पाकिस्तानी पारपत्र दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यांच्याकडे यासंबंधी कोणतीच कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना व्हिजा देण्यास नकार देण्यात आला.  त्यांनी ७ वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्यांची हि केस अपवाद असल्यामुळे येत्या दहा दिवसांमध्ये त्यांना आता भारतीय नागरिकत्व देण्यात देणार असल्याचा निर्णय अखेर घेण्यात आला आहे.