अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्याला लंडनमध्ये तुडवलं

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. परंतु शेजारील देश पाकिस्तानला मात्र या निर्णयामुळे झटका बसला होता. या निर्णयामुळे त्यांच्या अनेक नेत्यांची जीभ घसरली होती.

भारत सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. याच शेख रशीद यांच्यावर एका पुरस्कार सोहळ्यामध्ये हल्ला झाला. शेख हे पुरस्कार सोहळ्यासाठी एका बड्या हॉटेलमध्ये पोहचले होते. सोहळ्याच्या दरम्यान शेख सिगरेट फुंकण्यासाठी बाहेर आले असता अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

Loading...

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीशी संबंधीत नेत्यांनी घेतली आहे. शेख यांनी काही दिवसांपूर्वी पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांच्याबद्दल बोलताना अपशब्द वापरले होते. त्यामुळेच शेख यांच्यावर आसिफ अली खान आणि पक्षाच्या महिला शाखेच्या समा नमाज यांनी आम्हीच हल्ला केल्याचे म्हटले आहे.

शेख यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताला अनेक वेळा धमकी दिली आहे. त्यांनी भारतात पुन्हा एकदा पुलवामा सारखा हल्ला होईल असं विधान केले होते. तसेच मंत्री फवाद चौधरी यांनी युद्ध करण्याची भाषा केली होती . चौधरी यांनी, ‘संसदेत बेकार विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपल्याला भारताला खून, अश्रू आणि घामाने उत्तर दिले पाहिजे. आम्हाला युद्धासाठी तयार रहायला हवे’ असं विधान केले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ