पाकिस्तानी क्रिकेटरने IPL बद्दल दिली लक्ष्यवेधी प्रतिक्रिया, म्हणाला…

नवी दिल्ली : करोनाने जगभरात थैमान घातले आहे. याचा मोठा फटका क्रीडा विश्वाला देखील बसला आहे. अनेक स्पर्धा सध्या रद्द केल्या जात आहेत. IPL खेळवली जाऊ शकते का याची अधूनमधून चाचपणी देखील केली जात आहे.

सोसायट्यांच्या मनमानी कारभाराला चाप, घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारता येणार नाही

IPL च्या पहिल्या हंगामात पाकिस्तानच्या खेळाडूंना विविध संघात स्थान देण्यात आले होते. पाकचा वेगवान माजी गोलंदाज उमर गुल याने आपल्या पहिल्या IPL स्पर्धेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अशाप्रकारची खासगी स्पर्धा आम्ही पहिल्यांदाच खेळत होतो. IPL स्पर्धेत खेळाताना आम्ही खूप मजा केली असं गुल ने म्हटलं आहे.

गुल म्हणाला, २००७ साली टी-२० विश्वचषक स्पर्धेत मी सर्वाधिक बळी टिपले होते. त्यामुळे मला IPL मध्ये स्थान मिळाले होते. IPL संपताना शेवटच्या काही सामन्यांसाठी मला बोलवण्यात आले होते, कारण त्याआधी बांगलादेशचा संघ आमच्या देशात खेळत होता अन त्याच वेळी पहिल्याच सामन्यात मॅक्क्युलमने १५८ धावांची खेळी केली होती. अशी सुरूवात मिळणाऱ्या स्पर्धेबाबत सारेच उत्सुक होते. त्यानंतर आम्ही भारतात गेलो.

गृहनिर्माण संस्थेत घरकाम करणाऱ्या, कामगारांना प्रवेश नाकारू नये – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

पाकिस्तानी खेळाडूंचेही भारतात खूप चाहते आहेत हे तेव्हा समजलं. पण IPL पूर्णपणे वेगळ्याच स्तरावरील स्पर्धा आहे. IPL म्हणजे एक उत्सवच असायचा”, असा अनुभव उमर गुलने ‘क्रिककास्ट’मध्ये बोलताना सांगितला. भारतासोबत क्रिकेट खेळायला नेहमीच मजा येते असं देखील गुल म्हणाला.