‘अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपाची पाकिस्तानला किंमत चुकवावी लागेल’,अमेरिकेचा इशारा

joe-imran

अमेरिका : अफगाणिस्तानमध्ये केलेला हस्तक्षेप आता पाकिस्तानला महागात पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर विचार केला जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच फक्त आपल्याच नव्हे तर भारताकडून अफगाणिस्तानसंदर्भात केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणणारी पाकिस्तानची भूमिका असेल तर ‘बघून घेऊ’ अशी भूमिका अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटींनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात अमेरिकन स्टेट सेक्रेट्री अँथनी ब्लिंकेन यांनी ट्विट केले आहे की,’मागील २० वर्षांमध्ये तसेच त्यापूर्वीही पाकिस्तानने अफगाणिस्तानसंदर्भात घेतलेल्या भूमिकेनुसार त्यांनी अफगाणिस्तानच्या भविष्याबद्दल सातत्याने दावे केल्याचे दिसून आले. त्यांनी तालिबान्यांना आश्रय दिला ज्यामध्ये हक्कांनी समुहातील तालिबान्यांचाही समावेश होता.’असेही ते म्हणाले. तसेच ‘पुढील काही आठवड्यांमध्ये अमेरिका पाकिस्तानसोबत असणाऱ्या संबंधांबद्दल विचार विनिमय करणार आहे,’असे ब्लिंकेन म्हणाल्याचे ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

तसेच पाकिस्तानकडून अशी भूमिका घेण्यात आल्यामागे त्यांचे काही विशिष्ट हेतू असतील आणि त्यापैकी काही अफगाणिस्तानसंदर्भातील आमच्या तसेच भारत अफगाणिस्तानमध्ये बजावत असणामऱ्या भूमिकेविरोधात जाणारे असतील तर आम्ही त्याकडे नक्कीच कटाक्षाने लक्ष देणार असल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पाकिस्तानी गुप्तचर संघटना असणाऱ्या आयएसआयचे प्रमुख हामिद फैज यांनी काही आठवड्यांपूर्वी केलेल्या काबूल दौऱ्यामध्येच सरकारच्या बांधणीसंदर्भात सुरुवातीचे काम झाल्याची माहितीही समोर आली होती. तसेच पाकिस्तानच्या मदतीनेच तालिबानने सध्या हंगामी नेतृत्व हसन अखुंदकडे दिल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या