कलम ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तानने भारतातील उच्चायुक्तांनाही माघारी बोलावले

blank

टीम महाराष्ट्र देशा: जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाक संसदेत झालेल्या गदारोळात काल पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर हल्ला करण्याची भाषा वापरली आहे. तर भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत.

मोदी सरकारच्या कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानने निर्णयाचा निषेध केला आहे, पाकने भारतासाठी हवाई मार्ग बंद केला आहे. तसेच भारताच्या राजदूतांना जाण्यास सांगितले आहे. ६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी बालाकोट एअर स्ट्राईक नंतर भारतासाठी हवाई मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र तो कालांतराने खुला केला.

कलम ३७० रद्द केल्यामुळं पाकिस्ताननं भारताशी असलेले सर्व प्रकारचे व्यापारी संबध तोडण्याची घोषणा केली. राजनैतिक संबधही पाकिस्ताननं तोडले असून पाकिस्तानातले भारतीय उच्च्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात परत पाठवण्यात आलं आहे. काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली इस्लामाबाद इथं झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानचे भारतातले उच्चायुक्तही आता भारतात राहणार नसल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी सांगितलं.

दरम्यान, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेतलं ३७०वं कलम रद्द करण्याच्या विधेयकाला राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी काल मंजुरी दिली. यामुळे आता जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.जम्मू काश्मीर राज्यातल्या काही शहरातली संचारबंदी काल चार तासांसाठी स्थगित करण्यात आली होती.

फडणवीस सरकारच्या निर्णयाने संजय मामांच फावलं, अविश्वास ठरावाची टांगती तलवार कायम

मुंडे साहेबांनी वैद्यनाथ कारखान्याला काळजाप्रमाणे जपलं, पण त्यांचाच वारसदारांनी शेतकऱ्यांना लुटले