पाकला अण्वस्त्रांची खुमखुमी, अण्वस्त्र हल्ला काय असतो ते दाखवून देण्याची धमकी

भारताने भ्रमात राहू नये

टीम महाराष्ट्र देशा: भारतातातील दहशतवादी कारवायांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानने आपल्याकडील अण्वस्त्रांची खुमखुमी दाखवण्यास सुरुवात केल्याच दिसत आहे. कारण पाकचे परराष्ट्र मंत्री आसिफ ख्वाजा यांनी ट्विट करत भारताला थेट अण्वस्त्र हल्याची धमकी दिली आहे. तसेच पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते  मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सुद्धा भारताला धमकी दिली आहे.

भारताकडून येणाऱ्या धोक्यापासून संरक्षण करण्यात आम्ही समर्थ आहोत. पाकिस्तानकडे अण्विक अस्त्रे आहेत त्यामुळे भारताने कोणतेही धाडस करून नये. अशा शब्दात पाक ने भारताला धमकी दिली. पाकच्या अण्विक अस्त्रांविरुद्ध लढण्यासाठी भारत सीमेवर सरकारने दिलेल्या आदेशावर कोणतीही कारवाई करण्यास सज्ज असल्याचे भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले होते.

त्याला उत्तर देत पाकने हे वक्तव्य केले आहे. मेजर जनरल आसिफ गफूर म्हणाले, ‘आमच्याकडे सक्षम लष्करी दल आहे. आम्ही एक जबाबदार आणि लवचिक अण्विक राष्ट्र आहे. याची भारताने नोंद घ्यावी. भारताने काही कुरापती केल्यास आम्ही गप्प बसू अशा भ्रमात राहू नये’ पर्याय भारताने निवडायचा आहे. जर त्यांना पहायचे असल आम्ही काय करु शकतो तर तसा प्रयत्न करून पहावा. पाकिस्तान स्वत:च्या संरक्षणासाठी काहीही करु शकते. आम्ही एक जबाबदारी अण्विक क्षमता असलेला देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात युद्ध हा काही पर्याय नाही. दोन्ही देशांकडे अण्विक क्षमता आहे. यामुळे युद्ध होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी पाकिस्तानच्या सरकारी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गफूर यांनी स्पष्ट केले.