पाकिस्तानी संघ विकणे आहे; किमत फक्त ६५ रुपये

lahore

टीम महाराष्ट्र देशा- सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान क्रिकेट लीग सुरु असून या लीग मध्ये एकूण ६ संघ विजेतेपदासाठी खेळत आहेत. परंतु या टूर्नामेंट मध्ये सगळ्यात सुमार कामगिरी लाहौर कलंदर या संघाची असून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ५ पैकी ५ सामने या संघाने गमावले आहे. ब्रैंडन मैकुलम, सुनील नारायण, दिनेश रामदीन, उमर अकमल या सारख्या एकाहून एक सरस अशा प्लेयर्स चा भरणा असताना अजूनही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे . लाहौर कलंदर या संघाचे समर्थक देखील नाराज होत असून अशाच एका नाराज समर्थकाने एका शॉपिंग वेबसाइटवर चक्क हि टीम विकण्यासाठी असल्याची जाहिरात दिली आहे.

Loading...

pak team

ईबे नावाच्या शॉपिंग वेबसाईटवर देण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये सगळ्यात जास्त अपमानजनक गोष्ट म्हणजे या टीम ची किंमत. अवघ्या एका डॉलर म्हणजे ६५ रुपयांमध्ये हि टीम विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या संघातील उमर अकमलविरोधात मोठी नाराजी सोशल मिडीयावर पहायला मिळत आहे. सोशल मिडीयावर पाकिस्तानमध्ये सर्वात मोठा चेष्टेचा विषय हा संघ बनला आहे. ईबेच्या वेबसाईटवर आता हि जाहिरात दिसत नसली तरी या जाहिरातीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.

याआधी PSL मध्ये दिले जाणारे मानधन आणि इंडियन प्लेयर्सना आईपीएलमध्ये मिळणारे मानधन यावरून देखील PSLला ट्रोल करण्यात येत होत कारण विजेत्या संघाला 4 करोड़ 56 लाख रुपये एवढे बक्षीस मिळणार असून आयपीएल मध्ये अंडर 19संघातील खेळाडूंना यापेक्षा जास्त पैसे मिळत असतात.Loading…


Loading…

Loading...