पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल -निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : रमझान काळात जम्मू-काश्मीरमध्ये भारत सरकारकडून शस्त्रसंधीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र सीमेपलीकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. हल्ला झाला आणि आम्ही गप्प बसलो, असे कदापि घडणार नाही, असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकिस्तानला दिला आहे.

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, सीमेपलीकडून हल्ले झाले तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे अधिकार लष्कराला देण्यात आले आहेत. भारताच्या सीमा सुरक्षित ठेवणे हे आमचे कर्तव्यच आहे. आमच्यावर हल्ले करणाऱ्याला त्याचं भाषेत उत्तर दिले जाईल. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.Loading…
Loading...