अमेरिकेचा पाकिस्तानला पुन्हा झटका! ४ दहशतवाद्यांचा खात्मा

पाकिस्तान: अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला झटका दिला आहे. अमेरिकेकडून अफगाणिस्तानच्या सीमेलगत असणाऱ्या वजिरीस्तान प्रांतात ड्रोन हल्ले करण्यात आले. यामध्ये तालिबान-हक्कानी नेटवर्कच्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

अमेरिकेकडून पाकिस्तानच्या हद्दीत करण्यात आलेला हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. याआधी २४ जानेवारी रोजी केलेल्या हल्ल्यात हक्कानी नेटवर्कचा एक कमांडर मारला गेला होता. अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया होत असलेल्या या भागात हक्कानी नेटवर्कच्या कमांडरसह इतर दोन जण मारले गेले होते. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला वारंवार ड्रोन हल्ले करून लक्ष केले आहे. पाकिस्तानचा अमेरिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्दाफाश केला असून पाकिस्तान ड्रोन हल्ल्यांना विरोध करीत आहे. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांकडून दहशतवादाविरोधात चालवल्या जाणाऱ्या मोहिमेवर वाईट परिणाम होऊ शकतो. अशी भूमिका पाकिस्तानने स्पष्ट केली आहे.

You might also like
Comments
Loading...