इम्रान खान काही दिवसांसाठीच पंतप्रधान; पत्नी रेहमचा गौप्यस्फोट

कराची : इम्रान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खानने इम्रान खानवर टीका करताना म्हंटलं आहे की, इम्रान खान हे जरी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार असले तरी ते जास्त काळ पंतप्रधान राहणार नसल्याचं म्हंटलं आहे.

पुढे बोलताना रेहम म्हणाली की, माझ्या पुस्तक प्रदर्शनामुळे इम्रान खान यांना पंतप्रधान बनण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत याची मला खात्री होती. कारण हे सर्व आधीच ठरलेलं होतं. इम्रान केवळ एक्टर आहे तर तेथील लष्कर डायरेक्टर आहे.

हा जनाधार दिसत असला तरी हे सर्व आधीच ठरलं होतं. पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीने इम्रान यांनी हा विजय मिळवला आहे. पाकिस्तानच्या लष्कराला बूट पॉलिश करणाऱ्याची गरजच होती आणि यासाठी सद्यस्थितीत इम्रान खान यांच्यापेक्षा दुसरा योग्य व्यक्ती नव्हता म्हणून त्यांनी लष्कराच्या मदतीने सत्ता स्थापन केली. मात्र इम्रान फारकाळ पंतप्रधान पदावर राहू शकणार नाही.

अमेरिकेचा पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ला

मुलाच्या लग्नासाठी महिला कॉंग्रेस नेत्याने केले मुलीचे अपहरण