मी प्रेम आणि शांततेचा संदेश घेऊन पाकिस्तानात आलो आहे – सिद्धू

टीम महाराष्ट्र देशा – मी प्रेम आणि शांतीचा सदिच्छा दूत म्हणून आपल्या मित्राकडे आलो आहे’. असं विधान पाकिस्तानला पोहोचल्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या पीटीआयचे प्रमुख इम्रान खान १८ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. इम्रान खान यांच्याकडून शपथविधीसाठी मिळालेल्या अधिकृत निमंत्रणानंतर नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानात पोहोचले आहेत.

नेमकं काय म्हणाले सिद्धू ?

‘मी एक राजकीय व्यक्ती म्हणून येथे आलेलो नाही आपण एक सदिच्छा दूत म्हणून पाकिस्तानला जात आहोत, जेणेकरुन दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील. ‘इम्रान खान यांना खेळताना आपल्या कमतरतेला सामर्थ्य बनवताना मी पाहिलं आहे. आज पाकिस्तानला याची गरज आहे’.

संधी मिळाली तर कसोटीमध्ये सलामी करण्यासाठी तयार : रोहित शर्मा