विश्वचषकात पाकिस्तानवर मिळवलेला विजय हा भारताचा दुसरा स्ट्राईक होता : अमित शाह

टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकातील सगळ्यात रोमांचक आणि लक्षवेधी अश्या भारत वि.पाकिस्तान सामन्यामध्ये भारताने पुन्हा एकदा परंपरा राखत पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला आहे. आक्रमक फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी ही भारताच्या विजयाची खास वैशिष्ट्य ठरली.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानच्या या निर्णयाला भारताने छेद देत आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 337 धावांचे लक्ष उभे केले. हे लक्ष उभे करताना रोहित शर्माची 140 धावांची खेळी, के एल राहुल आणि विराट कोहलीची अर्धशतकी खेळी कामी आली. फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांनीही आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला नमवले. 337 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची पूर्ती दमछाक झाली. फकर जमान आणि बाबर यांनी पाकिस्तानला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलदीप यादव च्या फिरकी गोलंदाजी समोर त्यांना टिकाव धरता आला नाही.

Loading...

दरम्यान पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजया नंतर भारतीय संघाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील भारताच्या कालच्या विजयला पाकिस्तानवरचा स्ट्राईक असे नाव दिले. त्यांनी आपल्या ट्विटर च्या माध्यमांतून भारतीय संघाचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारताने पाकिस्तानवर केलेला हा दुसरा स्ट्राईक होता, जो की टीम इंडियाने केला होता आणि याचा निकालही तोच लागला. उत्कृष्ट खेळाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन, या विजयाबद्दल प्रत्येक भारतीयास अभिमान वाटत आहे व प्रत्येकजण आनंदोत्सव साजरा करत आहे. असे व्टिट मध्ये म्हटले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....