कोरोनाने वाट लावली, पाकडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर…

imaran khan pak prime minister

इस्लामाबाद : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तान देशाची आर्थिक अवस्था बिकट आहे. सरकारी तिजोरी रिकामी असताना आलेल्या करोना संकटामुळे पाकची अवस्था आणखीच बिघडली आहे. आधीच अब्जावधीचे कर्ज आणि त्यावरील व्याज देणे पाकला शक्य होत नाही. अशा अवस्थेत पाकिस्तान सरकारने विदेशी कर्ज फेडण्यासाठी तब्बल १५ अब्ज डॉलरचे नवे कर्ज घेण्याची योजना आखली आहे. पाकिस्तान सरकारकडून एका वर्षात घेतले जाणारे हे विक्रमी कर्ज आहे.

पाकिस्तानमधील अर्थ मंत्रालयाने द एक्स्प्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार २०२००२१ या आर्थिक वर्षात नव्याने घेतल्या जाणाऱ्या १५ अब्ज डॉलरमधून जुने १० अब्ज डॉलर कर्ज फेडले जाणार आहे. ही व्याज वगळून असेलली रक्कम आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत पाकिस्तानवरील एकूण कर्ज ८६.४ अब्ज डॉलर वर जाईल.

युद्ध जिंकणारच : आतापर्यंत राज्यात ३० हजार १०८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी

एका वर्षात १५ अब्ज डॉलर इतक्या मोठ्या कर्जावरून पाकिस्तानवरील आर्थिक संकट किती गंभीर आहे हे दिसून येते. कर्जा शिवाय पाकिस्तानला परदेशी चलनाचा पुरवठा होत नाही. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडे १२ अब्ज डॉलर परदेशी चलनसाठा आहे. ही सर्व रक्कम कर्जातून मिळाली आहे.

गेल्या काही वर्षात पाकिस्तानवरील परदेशी कर्ज वाढत चालले असून जुलै २०१८ ते जून २०२१ या काळात पाकिस्तानने ४० अब्ज डॉलरचे नवे कर्ज घेतले असेल. यातील २७ अब्ज डॉलर जुने कर्ज फेडण्यासाठी केले जाईल. तर बाकीचे १३ अब्ज डॉलर अन्य सार्वजनिक कर्ज देण्यासाठी वापरले जाणार आहे.

चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठीची सक्ती; अन्यथा कारवाई करणार – वर्षा गायकवाड