काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

श्रीनगर : काश्मीरमधील नौशेरा विभागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आज पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा विभागात सकाळी १० वाजून ३० मिनिटांच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबारास सुरूवात झाली.

भारतीय सैन्याने गोळीबारास चोख प्रत्युत्तर दिले. यंदाच्या वर्षात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याचे प्रमाण वाढले असून १ ऑगस्टपासून तब्बल २८५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. २०१६या संपूर्ण वर्षात हा आकडा २२८पेक्षा कमी होता.