पाकिस्तानने माझा मानसिक छळ केला; अभिनंदन यांचा खुलासा

टीम महाराष्ट्र देशा – पाकिस्तानच्या कैदेत असताना आपल्यावर पाकिस्तानने शारीरिक नाही परंतु मानसिक छळ मोठ्या प्रमाणात केला असा उलगडा भारतीय वायुसेनचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी आज केला आहे.

याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले असून सूत्रांचा हवाला देत या वृत्तसंस्थेने, ‘पाकिस्तानवरून परतल्या नंतर विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानच्या अटकेत असताना पाकिस्तानकडून आपला शारीरिक छळ केला गेला नसला तरी आपला मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक छळ झाल्याची माहिती दिली आहे.’ असे ट्विट केले आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची शुक्रवारी रात्री पाकिस्तानने सुटका केली. पाकिस्तानने अभिनंदन यांना माणूसकी दाखवत त्यांच्यासोबत चांगला व्यवहार केल्याचा दावा केला असला तरी अभिनंदन यांनी मात्र पाकिस्तानात त्यांचा मानसिक छळ झाल्याचे सांगितल्याचे समजते आहे.

पाकिस्तानच्या तावडीतून अभिनंदन यांची सुटका होण्याआधी पाकड्यांनी त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल करून त्यांना पाकिस्तानात कशी चांगली वागणूक दिली गेली हे अभिनंदन यांच्याकडून जबरदस्तीने वदवून घेतले होते. हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठीच पाकिस्तानने दोनदा अभिनंदन यांना भारताला सोपविण्याची वेळ बदलली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानात त्यांच्या लष्कराचे गोडवे गायले जाऊ लागले होते.

मात्र अभिनंदन यांनी सांगितलेली खरी परिस्थिती वेगळीच असल्याचे समजते. ‘पाकिस्तानमध्ये माझ्यावर शारीरिक अत्याचार झाले नसले तरी तेथे माझ्यावर प्रचंड मानसिक छळ झाला’ असे अभिनंदन यांनी सांगितल्याचे समजतेLoading…
Loading...