आणि पाकिस्तान सरकारच्या वेबसाईट पोस्ट झाले ‘भारताचे राष्ट्रगीत’

pakisatan website hack

वेबटीम : पाकिस्तान सरकारची अधिकृत वेबसाईट गुरुवारी हॅक करण्यात आली. हि वेबसाईट हॅक करणाऱ्याने त्यावर भारताचे राष्ट्रगीत आणि स्वातंत्रता दिवसाच्या शुभेच्छा पोस्ट केल्या आहेत.

हा प्रकार समोर येताच पाकिस्तान सरकारने वेबसाईट पूर्णपणे पुर्वव्रत करून हा सर्व मजकूर हटवला आहे . दरम्यान चार महिन्यापूर्वी पाकिस्तानी हॅकर्सनी चार भारतीय शैक्षणिक संस्थाच्या वेबसाईट हॅक केल्या होत्या.

पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक करण्याची हि पहिलीच वेळ नसून या आधीही दोन महीन्यांपूर्वी पाकिस्तान सरकारच्या तब्बल ३० वेबसाईट हॅक करण्यात आल्या होत्या.