आधी घुसून मारलंं आता घुसल्यावर मारलंं, काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं

टीम महाराष्ट्र देशा: पाकिस्तानमधील बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाई ह्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्रभर सामान्य नागरिकांच्या आडून गोळीबार केल्यानंतर आज पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भारतीय वायुसेनेने पाकिस्तानचं एफ-16 हे विमान पाडल्याची माहिती समोर आली आहे.

वृत्तसंस्था एएनआयने हे दिलेल्या वृत्तानुसार आज सकाळी पाकिस्तानची तीन विमानं भारतीय हद्दील शिरल्यानंतर भारतीय वायुसेनेनं ही कारवाई केली आहे. दरम्यान, सध्या सर्व हवाई तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंगळवारी भारताने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानचेने धमकी देत भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर दिले देणार असल्याच सांगितल होत. यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. या तीन विमानांना भारतीय हवाई दलाने पिटाळून लावले.