पाकिस्तानने हिंदूंचं ‘हे’ ऐतिहासिक धार्मिक स्थळ पाडलं

टीम महाराष्ट्र देशा :  पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेले हिंदूंचे ऐतिहासिक गुरु नानक महाल समाजकंटकांनी पाडला आहे. महालात लावलेल्या महागड्या खिडक्या आणि दरवाजे तोडून ते विकले असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेले हिंदूंचे ऐतिहासिक गुरु नानक महालाची चार मजली बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगवर शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांचे फोटो आहेत. हा महाल ४०० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. इथं भारतासह परदेशातून लाखो पर्यटक भेट देतात.
परंतु काही समाजकंटकांनी गुरु नानक महालाचा काही भाग समाजकंटकांनी पाडला. याचबरोबर, महालात लावलेल्या महागड्या खिडक्या

आणि दरवाजे तोडून ते विकले असल्याचे वृत्त आले आहे. पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्रात या संदर्भात माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे, लाहोरपासून अवघ्या १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या नारौवल शहरात हा महाल आहे. यात एकूण १६ खोल्या असून प्रत्येक खोलीला तीन दरवाजे लावण्यात आले आहेत.