मुंबई : इंटर सिटी चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) स्थानिक संघात निवड न झाल्याने दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबादमधील एका तरुण क्रिकेटपटूने आत्महत्येचा प्रयत्न केला. वेगवान गोलंदाज शोएबने त्याच्या हाताची नस कापली आणि कुटुंबीयांनी त्याला मंगळवारी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात नेले. कुटुंबातील एका सदस्याने सांगितले, की इंटर सिटी चॅम्पियनशिपच्या चाचणीनंतर प्रशिक्षकाने शोएबची संघात निवड केली नाही, त्यानंतर नैराश्यामुळे त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले.
कुटुंबातील सदस्याने सांगितले, ”आम्हाला तो आमच्या खोलीच्या बाथरूममध्ये सापडला आणि त्याचे मनगट कापले गेले. तो बेशुद्ध पडला होता आणि आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले, जिथे तो अजूनही गंभीर आहे.” फेब्रुवारी २०१८मध्ये, कराची अंडर-१९ क्रिकेटपटू मोहम्मद जरयाब याने शहरातील अंडर-१९ संघातून वगळल्यानंतर त्याच्या घरी गळफास लावून घेतला होता.
यापूर्वी पाकिस्तानचे माजी कर्णधार झहीर अब्बासबाबत मोठी बातमी आली आहे त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर लंडनमधील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. नुकतेच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
महत्त्वाच्या बातम्या –