पाकिस्तानकडून आरएसएस वर बंदी घालण्याची मागणी…

आरएसएस

नवी दिल्ली: भारत पाकिस्तान हा वाद नवीन नाही यामध्ये अनेकदा केवळ मुद्दा बदलेला असतो. तो कधी दहशतवादी हल्ले, सीमेवरील पाकिस्तान च्या कुरापती तर अनेकदा खोटे वक्त्यव्य करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न देखील पाकिस्तान करत असते तर यावेळी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताविरोधी प्रचार केला आहे. संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठावरून थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर भाजपा आणि काश्मीरबाबतही संयुक्त राष्ट्रांत अनेक खोटी वक्तव्य केली आहेत.

मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत संयुक्त राष्ट्रांतील पाकिस्तानचे राजदूत मुनिर अकरम जगभरातील हिंसक राष्ट्रवादी संघटनांना दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली. हिंसक राष्ट्रावादाचा उदय रोखण्यासाठी पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत यावेळी सूचना केल्या. पाकिस्ताननं आपल्या सूचनांमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे सर्व राष्ट्रांनी आपल्या देशातील हिंसक राष्ट्रवादी संघटनांना दहशतवादि संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी केली. यावेळी पाकिस्तानकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही उल्लेख करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रवाही हिंसक समुहांमध्ये सामील करण्यासाठी १२६७ प्रतिबंध समितीचा विस्तार करायला हवा,असंही अकरम म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या देशातील दहशतवाद सोडून अन्य सर्व विषयांवर भाष्य केलं.

यावेळी जगभरातील हिंसक राष्ट्रवादी संघटनांबद्दल बोलताना पाकिस्तानने पाकिस्तानकडून मधील दहशदवादी कारवाया पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारावर आणि त्यांच्या परिस्थितीवर कोणतंही भाष्य केलं नाही. त्यामुळे पाकिस्तानने खोटे आणि उलटे आरोप केल्याच बोलल जात आहे. तर यावेळी पाकिस्तानि राजदूतांनी पुन्हा काश्मीरच्यामुद्द्यावर देखील भाष्य करत लष्करावरही खोटे आरोप केले. भारतीय लष्करच काश्मीरमध्ये भीती निर्माण करण्याचं काम करत आहे. तसंच लष्कर पाकिस्तानात मानवताविरोधी गुन्हे करत असल्याचंही बेजबाबदार वक्तव्य केलं.

महत्वाच्या बातम्या