रावळपिंडी : पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यामध्ये रावळपिंडी येथे खेळण्यात आलेल्या कसोटीच्या पाचव्या म्हणजेच अखेरच्या सत्रात इंग्लंडच्या भेदक गोलंदाजी समोर पाकिस्तानी संघाचे फलंदाज टिकू शकले नाही. या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या जेम्स ॲडरसनने 36 धावा देत 4 बळी घेतले होते. तर, ओली रॉबिन्सने 50 धावा देत 4 बळी घेलते. या दोघांच्या उत्कृष्ट खेळीवर इंग्लंडने कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानला 74 धावांनी पराभूत केले. पाकिस्तानच्या या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) मध्ये भारतीय संघाची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.
पाकिस्तानला शेवटच्या सत्रात विजय मिळवण्यासाठी 86 धावांची गरज होती. मात्र ॲडरसन आणि रॉबिन्सनच्या भेदक गोलंदाजी समोर पाकिस्तान संघाला झुकावे लागले. तर, या सामन्यांमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्ट्रोक्स देखील आक्रमक क्षेत्ररक्षण करताना दिसून आला. या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील पाकिस्तान संघाचे स्थान होते तसेच आहे. म्हणजेच या सामन्यानंतर क्रमवारीत पाकिस्तान भारताच्या खालीच आहे. परिस्थितीत या स्पर्धेसाठी भारताचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू होण्याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीमध्ये पाकिस्तान संघ पाचव्या स्थानी होता. या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. कारण पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका घरच्या मैदानावर खेळणार होता. मात्र, रावळपिंडीतील कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानच्या फलंदाजीमध्ये झालेली गडबड त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. आम्ही पाकिस्तान संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर पडावे लागते की काय? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
पाकिस्तान सध्या या क्रमवारीत पाचव्या स्थानावर कायम आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपापल्या आगामी कसोटी मालिकेमध्ये विजय मिळवला तर बाबर आझामच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर पडावे लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये करो की मरो या स्थितीत खेळावे लागणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Shah Rukh Khan | ‘KGF’ आणि ‘कांतरा’च्या निर्मात्यांसोबत शाहरुख खान करणार धमाकेदार फिल्म
- Hair Care Tips | केसांची वाढ आणि निगा राखण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे सेवन
- Mahaparinirvan Diwas | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिवस का साजरा केला जातो?, जाणून घ्या
- Cloves | हिवाळ्यात रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- T-20 World Cup | टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी युवा महिला संघाचे नेतृत्व करणार शेफाली वर्मा