मी लाहोरमध्ये पूर्णत: सुरक्षित आहे – उमर अकमल

मृत्युच्या अफवेमुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल वैतागला

मुंबई: स्वतःच्या मृत्युच्या अफवेमुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल चांगलाच वैतागला असून त्याने स्वत: सोशल मीडियावर त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. उमरने एक व्हिडीओ ट्विट करुन, आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल याचा अपघाती मृत्यू झाल्याची पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये उमर अकमलसारखाच दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो जोडण्यात आला आहे. त्याचा चेहरा रक्तबंबाळ झाल्याचं या फोटोत दिसतं.मी लाहोरमध्ये पूर्णत: सुरक्षित आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट ही अफवा आहे. मी नॅशनल टी 20 चषकाच्या सेमीफायनलमध्ये खेळणार आहे, असं उमरने व्हिडीओमध्ये म्हटलंय.

You might also like
Comments
Loading...