पाकिस्तानी क्रिकेतपटूची ‘निकलपडी’

भारताला नमवल्याने करोडोंची बक्षिस

पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताला नमवून चॅम्पियन्स ट्रॉफीचे पहिल्यांदाच विजेतेपद पटकाविणाऱ्या पाकिस्तानी संघाचे  मायदेशात जल्लोषात स्वागत झाले आहे. या स्वागता बरोबरच आता त्यांच्यावर करोडोंच्या बक्षिसांचा वर्षावही होत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाची २० कोटींची रक्कम संघाला  मिळाली आहे, आता पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रु. देण्याची घोषणा केली आहे. या संघाचा सरकारतर्फे जंगी सत्कारही करण्यात येणार आहे   या खेळाडूंना त्यांच्या केंद्रीय करारांतर्गत २ कोटी ९० लाख रुपयेही मिळणार आहेत.

त्याशिवाय, बोर्डाकडून प्रत्येक खेळाडूला १० लाखांचे इनामही देण्यात येईल. येथील बिल्डर रियाझ मलिक यांनीही प्रत्येक खेळाडूला १० लाख रु. व जमिनीचा तुकडा जाहीर केला आहे. मोठ्या प्रमाणात खेळाडूंवर जाहिरातींचा वर्षाव होणार आहे.

You might also like
Comments
Loading...