Kulbhushan Jadhav- कुलभूषण जाधव यांच्या आईला पाकिस्तान विजा देण्याची शक्यता?

सुषमा स्वराज यांच्या ट्विटमुळे माध्यमांनी धरलं पाकिस्तानला धारेवर

पाकिस्तानच्या जेलमध्ये बंदिस्त असलेल्या कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या आईला पाकिस्तानकडून वीजा मिळण्याची शक्यता तयार झाली आहे. पाकिस्तानमधील मिडीयाने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आधारावर याबाबत माहिती प्रसिद्ध केलीये.

याविषयी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री सरताज अजीज यांच्यावर ट्विटरद्वारे जोरदार हल्ला केला.  कुलभूषण यांच्या आईला पाकिस्तानात जाण्याचा वीजा देण्याची मागणी भारताने पत्राद्वारे केली होती.  त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेयं की

bagdure
              ‘ पत्राचं उत्तर देण्याचा शिष्टाचारही पाळला नाही’.  याचवेळी त्यांनी असंही म्हटलंय की, ‘आम्हाला पाकिस्तानामधून भारतात उपचारांसाठी वीजा मागणाऱ्या सर्व नागरिकांबाबत आम्हाला सहानुभूती आहे’. असं म्हणत त्यांनी डीप्लोमॅटीक भूमिका घेत पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलायं.
या स्वराज यांच्या ट्विट नंतर माध्यमांनी अजीज यांना चांगलच धारेवर धरले असून पाकिस्तान सरकारवर दबाव निर्माण झाला आहे.कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. त्यांच्याशी बोलण्यासाठी कुलभूषण यांच्या आईला वीजा मिळाल्यास ही अतिशय महत्त्वाची बाब राहील.
You might also like
Comments
Loading...