नवाज शरीफांच्या बर्थडेच रिटर्न गिफ्ट; पाकिस्तानने भारताला पाठवले 2.86 लाखांचे बील

पाकिस्तानने फाडले पंतप्रधान मोदींच्या नावे बिल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षापूर्वी अचानक पाकिस्तानला धावती भेट दिली होती. यावेळी भारतासह जगभरातून आश्चर्य व्यक्त करण्यात आल होत. मोदी यांनी भेट दिलेल्या दिवशीच पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचा वाढदिवस होता. दरम्यान, आता हे सर्व चर्चेत येण्याच कारण म्हणजे त्यावेळी मोदींच्या विमानाला ‘रुट नॅव्हीगेशन’ म्हणजेच दिशा मार्गदर्शन केल्याबद्दल पाकिस्तानकडून भारताला पाठवण्यात आलेले 2.86 लाखाचे बिल.

लोकेश बत्रा यांनी माहिती अधिकारातून ही माहिती मिळवली आहे. परदेशी दौऱ्यांच्यवेळी पंतप्रधान मोदींचं एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या आकाशातून गेलं, त्या त्या वेळेचे नेव्हिगेशन चार्जेस पाकिस्तानने आकारले आहेत 5 डिसेंबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया आणि अफगाणिस्तानचा दौरावरून परत येत होते. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विनंतीवरुन त्यांनी अचानक पाकिस्तानमध्ये थांबा घेतला. त्यावेळी रुट नॅव्हीगेशनपोटी पाकिस्तानकडून 1.49 लाखाचे शुल्क आकारण्यात आले.

मार्च 2016 मधील इराण दौऱ्यासाठी 77 हजार 215 आणि कतार दौऱ्यासाठी आकरण्यात आलेल्या 59 हजार 215 रुपयांच्या बिलाचा यात समावेश आहे. .