गडकरींनी केला नौदलाचा अपमान

टीम महाराष्ट्र देशा  – नौदलाला घरांसाठी मुंबईत एक इंचही जागा देणार नाही… अशा शब्दांत केंद्रीय जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत नौदल अधिकाऱ्यांचा अपमान करत त्यांच्यावर टीका केली आहे. गडकरी म्हणाले, अनेकदा नौदल अधिकारी माझ्याकडे घरासाठी दक्षिण मुंबईत जागा द्या म्हणून येत असतात. अशा कामांना आपण बिलकूल थारा देत नाही.

प्रत्येक नौदल अधिकाऱ्याला दक्षिण मुंबईतच जागा कशासाठी हव्यात? तिकडे सीमेवर यांची गरज आहे. पाकिस्तान, चीन सीमेवर यांची गरज आहे. दहशतवादी तिथे आहेत ना; नौदल अथवा संरक्षण मंत्रालय म्हणजे सरकार नव्हे, तर केंद्रामध्ये सरकार आहे आणि आम्ही त्यात आहोत, असेही त्यांनी खडसावले. इंदिरा डॉकमध्ये प्रस्तावित मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे भूमिपूजन नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नौदलाचे कमांडंट चीफ व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीष लुथ्रा उपस्थित होते.