विजय भारताचा पण फायदा मात्र पाकिस्तानचा!

india-v-pakistan-

टीम महाराष्ट्र देशा: विराट कोहलीच्या टीम इंडियाने पहिल्या टी २० सामन्यात न्यूझीलंडचा तब्बल ५३ धावांनी धुव्वा उडवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १ ० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा जरी या मालिकेत विजय झाला असला तरीपण याचा खरा फायदा मात्र पाकिस्तानला झाला आहे.

आयसीसी टी २० क्रमवारीमध्ये न्यूझीलंडला या सामन्याच्या पराभवामुळे आपले नंबर वन चे स्थान गमवावे लागले आहे. तर आयसीसीच्या क्रमवारीत दोन नंबरला असलेल्या पाकिस्तानला भारताच्या विजयाने नंबर वन ला नेऊन ठेवले आहे. आयसीसी क्रमवारीत सध्या पाकिस्तान २८४३ गुणांसह नंबर वन ला आहे तर त्या खालोखाल न्यूझीलंड, वेस्टइंडीज, इंग्लंड व टीम इंडिया नंबर पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे भारताच्या या शानदार विजयाचा फायदा मात्र आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला झाला आहे.