अखेरच्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा इंग्लंडकडून ३ गडी राखुन विजय

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या टी-२० सामन्यात पाकिस्तानला ३ गडी राखुन पराभव स्विकारावा लागला. पाकिस्तानने दिलेल्या १५५ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ७ गडी गमावत सहज पार केले. यासह इंग्लंडने तीन टी-२० सामन्याची मालिका २-१ अशी जिंकली.

अखेरच्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित २० षटकात पाकिस्तानने ६ गडी गमावत १५४ धावांची मजल मारली. सलामीवीर मोहम्मद रिझवानने ५७ चेंडुत ५ चौकार आणि ३ षटकारासंह सर्वाधीक ७६ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून आदिल रशिदने सर्वाधीक ४ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात इंग्लंडने २ चेंडु बाकी असताना ७ गडी गमावत सहज पार केले. यासह इंग्लंडने सामना आणि टी-२० मालिका २-१ अशा फरकाने जिंकला. इंग्लंडकडून या डावात सलामीवीर जेसन रॉयने ३६ चेंडुत १२ चौकार आणि १ षटकारांसह सर्वाधीक ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद हफिजने सर्वाधीक ३ गडी बाद केले. धडाकेबाज अर्धशतकासाठी जेसन रॉयला सामनाविर आणि लियाम लिव्हिंगस्टोनला मालिकाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP