भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा 12 सदस्यीय संघ जाहीर

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा 12 सदस्यीय संघ जाहीर

pakistahn

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ICC T20 विश्वचषक 2021 चा बहुचर्चित सामना रविवार 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. या सामन्याने दोन्ही संघ स्पर्धेला सुरुवात करणार आहेत.

पाकिस्तानने रविवारी होणाऱ्या टी 20 विश्वचषक 2021 च्या सुपर 12 मधील भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दोन्ही संघांमधील हा मुकाबला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा १२ सदस्यीय संघ :

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, हैदर अली, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.

महत्वाच्या बातम्या