fbpx

अशी आली पाकिस्तानी साखर मुंबईच्या बाजारात ?

pak sugar in indian market

टीम महाराष्ट्र देशा: देशात मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन झाले असतानाही पाकिस्तानी साखर मुंबईच्या बाजारात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका बाजूला साखरेच्या मागणीत आलेली घट आणि दुसरीकडे शत्रू राष्ट्रातून साखर आयात करण्यात आल्याने सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र, हि साखर आयातच कशी झाली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पाकिस्तानमधील प्रसिद्ध ‘चिस्तीयन’ व ‘लालूवल्ली सिंध’ या ब्रॅंण्डची साखर नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे, हि साखर जवळपास ३० हजार क्विंटलच्या आसपास असल्याच बोलल जात आहे. दरम्यान, ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात इतर कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याचे सरकारी धोरण आहे, या धोरणाचा फायदा उठवत मुंबईतील एका बड्या कंपनीने ३० हजार टनाच्या आसपास साखर आयात केल्याची माहिती मिळत आहे.

एका बाजूला राज्य तसेच देशात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. पाकिस्तानी साखर मुंबईच्या बाजारात आल्याने साखरेचे दर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे सीमेवर सैनिकांचे बलिदान जात असताना देशात मात्र सैनिकांसह शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

तर ज्या गोदामात ही साखर ठेवली जाईल ती गोदामं पेटवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे, हवालदिल झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नव्हे, तर साखर चोळण्याचं काम मोदी सरकारने केल्याची टीकाही आव्हाड यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने आयातीवर शंभर टक्के शुल्क लागू केल्याने, कोठूनही साखर आयत होवू शकत नाही, त्यामुळे पाकिस्तानी साखर मुंबईच्या बाजारात आल्याच्या केवळ अफवाच असल्याच पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे.