पाकिस्तानने ५ वर्षांत २९८ भारतीयांना दिले नागरिकत्व

pak-grants-nationality-to-298-indians-in-5-years-ministry

नवी दिल्ली : पाकिस्तानने गेल्या ५ वर्षांत सुमारे २९८ भारतीयांना नागरिकत्व दिले, अशी माहिती पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली. पाकिस्तानने २०१२ ते १४ एप्रिल २०१७ दरम्यान २९८ भारतीयांना नागरिकत्व दिले आहे. २०१२ मध्ये पाकिस्तानने ४८ भारतीयांना नागरिकत्व दिले होते. २०१३ मध्ये ७५ तर, २०१६ मध्ये ७६ भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले आहे, असे सत्तारूढ पाकिस्तान मुस्लिम लीगचे खासदार शेख रोहेल असगर यांनी सांगितले. २०१५ मध्ये केवळ १५ भारतीयांना पाकिस्तानने नागरिकत्व दिले होते. तर, २०१६ मध्ये ६९ भारतीयांना नागरिकत्व देण्यात आले आहे. एप्रिलपर्यंत १४ जणांना पाकिस्तानचे नागरिकत्व मिळाले आहे.