कोरानामुळे एकादशीला पैठणचे नाथ मंदिर राहणार बंद

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचे गोदाकाठावरील समाधी मंदिर तसेच राहता वाडा
असलेले नाथमंदिर मंगळवारी महिन्याच्या एकादशी ( वारी) निमित्त होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे एक दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सोमवारी दिली.

पैठण शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे उपविभागीय अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अनमोल सागर यांच्या आदेशानुसार संत एकनाथ मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे यांना मंदिर एक दिवसासाठी बंद ठेवण्यात यावे, असे लेखी आदेश दिले आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात शिथिलता देण्यात आल्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी नाथमंदिर खुले केले होते. यामुळे भाविकांचे दर्शन सुरु झाले होते.

औरंगाबाद सह महाराष्ट्रभरातून भक्त दर्शनासाठी येत असतात. परंतु आता कोरोनाची दुसऱ्या लाटेची शक्यता आहे. पुन्हा कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाने देखील दिले आहे. मंगळवारी होणाऱ्या एकादशी वारी निमित्त भाविकांना नाथांचे बाहेरुन दर्शन घ्यावे लागणार आहे. या दर्शनासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे. तसेच गर्दी न करता दर्शन घ्यावे, असे आवाहन देखील तालुका प्रशासन तसेच मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या