संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसने चर्चेतून पळ काढला- रावसाहेब दानवे

danave1

औरंगाबाद: भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसवर वर टीकास्त्र सोडले आहे. संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कॉंग्रेसने चर्चेतून पळ काढला असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.

आज विरोधकांच्या निषेधार्थ भाजपकडून एकदिवसाच लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. संसदेत महत्वपूर्ण अशा अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी गोंधळ घालत कामकाज बंद पडले.

दरम्यान, खासदार रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, संसदेत अर्थसंकल्पीय विषयावर महत्वपूर्ण अधिवेशन कॉंग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी गोंधळ घालत वाया घातले. २३ दिवसात कसलेही कामकाज न झाल्याने सरकारचा पैसा व वेळ वाया गेला. सरकार त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असतानाही त्यांनी चर्चेतून पळ काढला. कॉंग्रेसची ही भूमिका लोकशाही विरोधी आहे. याचा निषेध म्हणून आज भाजप खासदार देशभरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत.